Ad will apear here
Next
पडघा केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात


भिवंडी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या २०१५पासून सुरू  केलेल्या उपक्रमांतर्गत शिक्षणात होणाऱ्या बदलांवर चिकित्सा व्हावी व शिक्षकांना योग्य माहिती मिळावी म्हणून भिवंडी तालुक्यातील पडघा शैक्षणिक केंद्राची मासिक शिक्षण परिषद पडघा-समतानगर बोरिवली जिल्हा परिषद मराठी शाळेत नुकतीच पार पाडली.

शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान पडघा केंद्राचे प्रमुख रमेश शेरे यांनी भूषविले. या वेळी मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व जीवन अधिक गतिमान करण्याच्यादृष्टीने पडघा केंद्रप्रमुख रमेश शेरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. ‘विद्यार्थी प्रगत करण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी’ यावर रमेश म्हसकर यांनी शिक्षकांना विविध पैलूंची माहिती देत मार्गदर्शन केले.

‘शिक्षकांना येणाऱ्या अडी-अडचणींवर कास्ट्राइब शिक्षक संघटना नेहमीच पाठपुरावा करेल,’ असे कास्ट्राइ शिक्षक संघटना अध्यक्ष विजयकुमार जाधव यांनी सांगितले. शिक्षकांना बँकेत येणाऱ्या अडचणींवर कशा प्रकारे मात करायची यावर शाम मोराणकर यांनी मार्गदर्शन केले. कवी मिलिंद जाधव यांनी शालेय जीवनावर आधारित कविता शिक्षण परिषदेत सादर केली.



या वेळी जिल्हा परिषद शाळा पडघा, भादाणे, शेरेकर पाडा, चिंबीपाडा, आन्हे, सोर, वांद्रे, देवळी, आनंद नगर बोरिवली (आदिवासी पाडा) बोरिवली, वैजोळा या ११ शाळा सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी सुरेखा गायकवाड, स्वाती गिरी, रमेश म्हसकर, हर्षला बांगर, शाम मोराणकर, प्रमोद शिंदे, मधुकर महानुभव, हेमलता पितळे, पुष्पा सोनावणे, अनिता सडेकर, सुनिता शिवदे, प्रशांत तुपे, शुभांगी चांदोरकर, शोभा शेवलो, गणेश गायकवाड, सुलेखा गायकवाड, धनश्री होले, रूपाली पाटील, सुनिता शिवदे, मनीषा सरकाटे, प्रकाश सोनावणे, बनाजी दरेकर, क्वादीर शेख, शाहिस्ता शेख, सुनिता सूर्यवंशी, मुशर्रत शेख, ताहिरा अन्सारी, नकिसा शेख, रूपाली पाटील, विजयकुमार जाधव, संतोष गाढे आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रश्मी दोंदे, माजी अध्यक्ष रोहिणी दोंदे, बोरिवली ग्रामपंचायत सदस्य आविष्कार दोंदे, विनोद जाधव, रोहिदास दोंदे, विद्या जाधव, मिलिंद जाधव यांसह महिला बचत गटांतील महिलांचीही या वेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन सहशिक्षिक्षिका स्वाती गिरी यांनी केले. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZNVBX
Similar Posts
भादाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला भालेकर भिवंडी : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व पाच गावांमध्ये विस्तार असलेल्या भादाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या उर्मिला रमेश भालेकर यांची आठ जानेवारी २०१९ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
पडघा मराठी शाळेत महात्मा फुले जयंती साजरी भिवंडी : तालुक्यातील पडघा केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद मराठी शाळेत येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची १९२वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.
प्रा. विकास उबाळेंना अर्थशास्त्राची डॉक्टरेट भिवंडी : बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक विकास उबाळे यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली.
सावंदे जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती भिवंडी : स्त्री शिक्षणाचे बीज रोवणाऱ्या समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती तालुक्यातील सावंदे जिल्हा परिषद शाळेत साजरी करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language